विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार -आ समाधान आवताडे

 विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार -आ समाधान आवताडे



प्रतिनिधी- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी आणू शकलो परंतु झालेल्या विकास कामांच्या निधीवर अर्थहीन भाष्य करणाऱ्यांना विकासाची कोणतीही दृष्टी नसल्यामुळे त्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार असा टोला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा व महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी या ब्रह्मपुरी, उचेठाण, बठाण, मुढवी, धर्मगांव, ढवळस, शरदनगर, देगांव, घरनिकी या गावांमध्ये प्रचार सभा पार पडल्या त्यावेळी ते बोलत होते.


पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या अगोदर निवडणुका जवळ आल्या की, दुष्काळ व पाणी प्रश्नावर बोलले जात होते. परंतु मी आमदार झाल्यापासून पाण्याच्या जवळपास सर्व योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. मी फक्त बोलत नाही तर ते करूनच दाखवतो. येत्या वर्षभरात राहिलेली सर्व विकास कामे पूर्ण होतील आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास झाल्याचे चित्र आपणा सर्वांना पहावयास मिळेल. त्याचबरोबर राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्यामुळे राहिलेल्या सर्व विकास प्रकल्पांची ही कामे गतिशील मार्गाने पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


सदर सभेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित जगताप यांनी बोलताना सांगितले की, गेल्या पन्नास वर्षात आपल्या मतदारसंघाचा विकास खुंटला होता. त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न केले आहेत. विकासाच्या वाटेवर चालणारा एक लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सर्वांनी त्यांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


या सभेसाठी दत्तात्रय जमदाडे, प्रकाश गायकवाड, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, उद्योजक रामचंद्र सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, माजी संचालक सुरेश भाकरे, संचालक अशोक माळी, राजन पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, रुक्मिणी दोलतोडे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश मोहिते, माजी सरपंच दत्तात्रय नवत्रे, युवराज शिंदे, संभाजी घुले, दिगंबर यादव, विश्वनाथ हेंबाडे, सचिन हेंबाडे भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad