आराधी,देवदासी,तृतीयपंथी यांच्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार : दिलीप धोत्रे
मनसेच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त आराधी,देवदासी तृतीयपंथींचा आहेर देऊन सन्मान.
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर येथील आराधी, देवदासी आणि तृतीयपंथीयांचा सन्मान सोहळा येथील गाडगे महाराज मठ पंढरपूर येथे संपन्न झाला.
यावेळी सर्व देवी भक्तांना फराळाचे वाटप करून साडी चोळीचा आहेर देण्यात आला.
याप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे बोलताना म्हणाले की सध्या नवरात्र उत्सवानिमित्त समाजातील आई भवानीचे भक्त म्हणून सेवा करणारे,आराधी, देवदासी, तृतीयपंथींचा सन्मान व्हावा. या उदात्त हेतूने मनसेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
वंचित दीनदुबळ्या सर्वसामान्य घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. महिन्याला पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच
शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजनाचां लाभ मिळवून देणारा,आई भवानी चरणी नतमस्तक होऊन मी आपणास शब्द देतो की आपल्या कोणत्याही अडचणी असल्यास मी सोडविण्यासाठी कटीबध्द आहे.
आपल मला मतदानरुपी
आशिर्वाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आराधी, गोंधळी देवदासी तृतीयपंथीं बहुसंख्येने उपस्थित होते.