तर विमा कंपन्या व सरकारचं खाली मुडक वर पाय केल्याशिवाय सोडणार नाही..शंकर गायकवाड*

 *तर विमा कंपन्या व सरकारचं खाली मुडक वर पाय केल्याशिवाय सोडणार नाही..शंकर गायकवाड*



पंढरपूर (प्रतिनिधी) दि.४ऑक्टोबर,

   ऊसाला पहिला हप्ता चार हजार व अंतिम दर प्रति टन सहा हजार रूपये आणि पिकविमा कंपन्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर न दिल्यास, पिकविमा कंपन्या व सरकारचं खाली मुंडके-वर पाय केल्याशिवाय सोडणार नाही असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे ऊस, डाळिंब व दूध परिषद पार पडल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला. त्यावेळी पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष चौगुले, विशाल फरकंडे, राजेंद्र भोसले, औदुंबर मोरे,  सत्यवान भोसले, हेमंत दांडगे, मारुती भाकरे, दादासाहेब ढोले, बाबासाहेब भाकरे, महादेव ढोले, युवराज खटावकर, अर्जुन घाडगे, विजय दांडगे, संजय भाकरे, संभाजी गांडुळे, दामाजी पवार, रेवन थिटे, हारून मुलाने, सर्जेराव घाडगे, नितीन खडतरे, शेखर शिंदे, अण्णा दांडगे, परमेश्वर दांडगे, अनिल ढोले, सचिन फरकंडे, अनिल भाकरे आदींसह पंचक्रोशीतील डाळिंब, ऊस व दूध उत्पादक बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना शंकर गायकवाड म्हणाले, मजुरी, खते, बियाणासह सर्वच निविष्ठांचे भाव प्रचंड वाढलेले असतानासुद्धा डाळिंब, दूध व ऊसासह सर्वच शेतमालाचे भाव हे मात्र त्या पटीत वाढून दिलेले नाहीत. मागील अनेक वर्षापासून शेतमालाच्या किमती या वाढलेल्या नाहीत, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत, म्हणून शासनाने शेतमालाचे भाव वाढवणे गरजेचे आहे, तसेच पिक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई न दिल्यास संबंधित शासकीय व पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयावरती तीव्र स्वरूपाची आंदोलने करणार असल्याचा इशाराही यावेळी गायकवाड यांनी या परिषदेतून दिला. यावेळी सिद्धाराम काकणकी व सुभाष चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे तर आभार समाधान आवताडे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad