हजारो बौद्ध बांधवांसह मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी घेतले नागपूर दीक्षाभूमी चे दर्शन
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पंढरपूर येथून निघालेली मनसे धम्म यात्रा नागपूर येथे दाखल
भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पंढरपूर /प्रतिनिधी
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी हजारो बौद्ध बांधवांसह नागपूर येथील दीक्षाभूमीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी हजारो बौद्ध बांधवांसह तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
हि धम्म यात्रा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार मतदारसंघातली हजार बौद्ध बांधवांना घेऊन १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनी नागपूर येथे दाखल झाली.
यावेळी हजारो बौद्ध बांधवांसोबत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी नागपूर दीक्षाभूमी येथे अभिवादन करून दर्शन घेतले.