*पंढरपूर सिंहगड मधील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात जनरेटिव ए आय या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागामध्ये जनरेटिव ए. आय. या विषयावर शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून रूपेश रनवरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. रूपेश रनवरे हे नाॅलेज बेस कन्सल्टंट (टेक्निकल), पुणे येथे कार्यरत आहेत. या व्याख्यानात त्यांनी जनरेटिव ए. आय. या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी ७५ हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
हे व्याख्यान यशस्वी
करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. सुमित इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुनम गवळी यांनी मानले.