*पंढरपूर सिंहगड मध्ये "लिंक्डइन प्रिमियम" या विषयावर कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी "लिंक्डइन प्रिमियम" या विषयावर कार्यशाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक अमोल चक्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रा. सिद्धेश पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अमोल चक्रे यांनी "लिंक्डइन प्रिमियम" खात्याचे महत्व आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. "लिंक्डइन प्रिमियम" हा नोकरी, इंटर्नशिप मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी सोशल मिडीयाचे साधन आहे. या "लिंक्डइन प्रिमियम" चा उपयोग विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विविध नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक प्रशिक्षण घेणेसाठी करत असतात. "लिंक्डइन प्रिमियम" च्या माध्यमातून अनेक नामांकित कंपन्या त्याचे नवनवीन तंत्रज्ञान या सोशल मिडीयावर शेअर करत असतात. "लिंक्डइन प्रिमियम" मध्ये अभियांत्रिकीचे विद्यार्थी, विविध नामांकित कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख एकञ येऊन एकमेकाशी संपर्क साधत असतात. याशिवाय जाॅब संदर्भात लिंक्डइन मध्ये पोस्ट असतात आणि ज्या व्यक्तीला कामाची, नोकरी ची आवश्यकता असते अशी पोस्ट पाहून अनेक जण नोकरीसाठी अर्ज करतात. नविन तंत्रज्ञान, नवनवीन कल्पना लिंक्डइन प्रिमियम द्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात करण्यासाठी उपयुक्त असल्याची माहिती अमोल चक्रे यांनी दिली.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिने मोफत लिंक्डइन प्रिमियम चे सदस्य मिळणार आहे. या कार्यशाळेत एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सर्व विभागातील तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. सिद्धेश पवार, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.