पंढरपूर सिंहगड मध्ये व्हॅल्यू
एँडिशन प्रोग्राम ऑन आर्डी युनो या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी या विभागात व्हॅल्यू एँडिशन प्रोग्राम ऑन आर्डी युनो या विषयावर तीन दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण संपन्न झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हे प्रशिक्षण हे १३ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात विद्युत अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणामध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून डॉ. संतोष भोपळे, डॉ. स्वाती संकपाळ व प्रा. अमोल यादव यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रशिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विनोद कुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.