पंढरपूर सिंहगड मध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टेलीकम्युनिकेशन: टॉप चॅलेंजेस" या विषयावर गेस्ट लेक्चर

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टेलीकम्युनिकेशन: टॉप चॅलेंजेस" या विषयावर गेस्ट लेक्चर*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टेलीकम्युनिकेशन:टॉप चॅलेंजेस " या विषयावर नितीन खपाले यांचे गेस्ट लेक्चर प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. हे लेक्चर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

     सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टेलीकम्युनिकेशन: टॉप चॅलेंजेस" या विषयावर नितीन खपाले यांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. सुरवातीला नितीन खपाले यांचे प्रा. अंजली पिसे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     यादरम्यान लेक्चर मध्ये नितिन खपाले म्हणाले, दूरसंचार उद्योगाच्या डायनॅमिक लँडस्केपमध्ये, अनेक आव्हाने कायम आहेत,.कनेक्टेड उपकरणे आणि बँडविड्थ-केंद्रित ऍप्लिकेशन्सच्या प्रसारामुळे चालविलेल्या डेटाच्या वापरामध्ये वाढ हे प्रमुख आव्हानांपैकी एक आहे. डेटा ट्रॅफिकमधील या वाढीमुळे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण येतो, ज्यामुळे गर्दी होते आणि सेवेचा दर्जा खालावतो, विशेषत: जास्त वापराच्या वेळेत. तथापि, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या गुंतागुंतीच्या समस्यांसाठी संभाव्य गेम-चेंजर म्हणून उदयास आले आहे, जे या गुंतागुंतीच्या समस्यांना सोपे करण्याचे आश्वासन देते. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टेलीकम्युनिकेशन:टॉप चॅलेंजेस" या नविन तंत्रज्ञानाची मुलांना ओळख व्हावी यासाठी हे लेक्चर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये इंटेलिजंट वर्चुअल असिस्टंट, कशासाठी लागते, ते काय काम करू शकतात याबद्दल मार्गदर्शन नितीन खपाले यांनी केले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील, डॉ. अल्ताफ मुलानी, प्रा. अंजली पिसे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. अनिता शिंदे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वर्धा बिडकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad