*पंढरपूर सिंहगड मध्ये "रिसेंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रिक वेहिकल अँड बॅटरी टेक्नॉलॉजी" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी "रिसेंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रिक वेहिकल अँड बॅटरी टेक्नॉलॉजी" या विषयावर माजी विद्यार्थी कुमार बालाजी पवार यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागाअंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानाच्या सुरुवातीस बालाजी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बालाजी पवार हा सिंहगड काॅलेज चा माजी विद्यार्थी असून यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मल्टी डीसीपलिनरी मायनॉर बेसिक ऑफ इलेक्ट्रिक वेहीकल, या विष्यांतर्गत त्याचे फायदे व इलेक्ट्रिक वाहनात कशा प्रकारे वापर करतात याची माहिती दिली. इलेक्ट्रिक वाहनात वापरात येणाऱ्या बऱ्याच वेग वेगळ्या बॅटरी यांच्या बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. किशोर जाधव, प्रा. विनोद मोरे आदींसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.