*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये "प्रॅक्टिकल ॲप्रोच टू व्हेहीक्युलर नेटवर्क" या विषयावर गेस्ट लेक्चर*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "प्रॅक्टिकल ॲप्रोच टू व्हेहीक्युलर नेटवर्क" या विषयावर प्रो. डी. मेश्राम यांचे गेस्ट लेक्चर प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. हे लेक्चर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक 3 ऑगस्ट २०२४ रोजी "प्रॅक्टिकल ॲप्रोच टू व्हेहीक्युलर नेटवर्क" या विषयावर प्रो. डी. मेश्राम यांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. सुरवातीला प्रो. डी. मेश्राम यांचे प्रा. अंजली पिसे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान लेक्चर मध्ये प्रो. डी. मेश्राम म्हणाले, आजच्या धावपळीच्या काळात माणूस वाहनांवर अवलंबून आहे. वाहन चालवताना कधी कधी चुकून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यामध्येच चालक यांना झोप लागणे, अचानक समोरच्या वाहनाने दिशा बदलणे, नियमबाह्य वेग आदी कारणे अपघात होण्यास कारणीभूत ठरतात. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने "व्हेहीक्युलर नेटवर्क" या नविन तंत्रज्ञानाची मुलांना ओळख व्हावी यासाठी हे लेक्चर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये व्हेहीक्युलर नेटवर्क कशासाठी लागते, ते काय काम करून शकतात त्यांचा साॅफ्टवेअर कोड कसा लिहावा याबद्दल सखोल मार्गदर्शन प्रो. डी. मेश्राम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अंजली पिसे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. स्वप्निल टाकळे, आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वेदिका साळुंखे यांनी केले.