*पंढरपूर सिंहगड मध्ये "आधुनिक मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी" या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी "आधुनिक मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी" या विषयावर प्रा. एस.ए. जेऊरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. ए. जेऊरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रा. जेऊरकर यांचे डाॅ. अतुल आराध्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जेऊरकर म्हणाले, आत्ताच्या काळात रॅपिड प्रोटोटाइपिंग ,ॲडव्हान्सड मॅन्युफॅक्चरिंग या मशिनरी जुन्या पद्धतीच्या लेथ मशीन ड्रिलिंग मशीन यांना रिप्लेस करणार आहेत या विषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात उद्योजकता आणि नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत असे मत प्रा. जेऊरकर यांनी यादरम्यान मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. समाधान माळी, प्रा. अभिजीत गोडसे, प्रा. धनंजय गिराम, समाधान वसेकर आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.