स्वेरीच्या २१ विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीत निवड

                                             

स्वेरीच्या २१ विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीत निवड



पंढरपूरः ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

             ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून शरयू शेखर गरड, भाग्यश्री ऋषिकेश पाटील, आशुतोष दर्लिंग माने, शिल्पा भाऊ भुसनर, स्नेहल संजय कोरे, सागर उमेश पाटील, प्रमोद नागनाथ कोरके, प्रज्ञा संजय माने, अमित अभिमन्यू जाधव, रोहन नवनाथ सुरवसे, पल्लवी दत्तात्रय कोकरे, पल्लवी सुरेश बचुटे, श्रेया काशिनाथ शिंदोळ, पवन राजेंद्र शिंदे, शिवप्रसाद पांडुरंग कारंडे, तुषार मोहन मेटकरी, सौरभ धनाजी घाडगे, जगन्नाथ परशुराम आवताडे, आदित्य कांतीलाल नकाते, आसावरी भिमराव चव्हाण व प्रगती सुरेश साळुंखे या २१ विद्यार्थ्यांची निवड केली. या कंपनीची स्थापना १९६१ साली झाली असून बाबा कल्याणी हे या पूर्ण ग्रुपचे चेअरमन आहेत. ही कंपनी फोर्जिंग, मेटल्स, अॅटोमोटिव्ह, डिफेन्स,  एनर्जी या क्षेत्रामध्ये  कार्यरत आहे. या कंपनीत सध्या ५ हजारापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad