*पंढरपूर सिंहगड मध्ये "लाईफ इज ऑल पॉसिटीव्ह" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये दिक परासिनी यांचे व्याख्यान संपन्न
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी "लाईफ इज ऑल पॉसिटीव्ह" या विषयावर दिक परासिनी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याखानाची सुरवात सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे हस्ते दिक परासिनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिक परासिनी म्हणाले, आयुष्य हे संपूर्णपणे सकारात्मक असून त्यामध्ये नकारात्मकता नाही हे विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची दिक परासिनी यांनी समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले.
या कार्यक्रमात सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये द्वितीय वर्षांत शिकत असलेले सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पंधे व अनिष्का राऊत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिपक गानमोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.