*पंढरपूर सिंहगड मध्ये "राष्ट्रीय ग्रंथालय दिन" साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी डाॅ. एस. आर. रंगनाथन यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. ग्रंथालय शास्ञाचे आद्य प्रवर्तक डाॅ. रंगनाथन यांचा १२ ऑगस्ट या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय ग्रंथपाल दिन पंढरपूर सिंहगड मध्ये साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या डाॅ. रंगनाथन यांचा ग्रंथालय विकासात मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम त्यांनी रुजवला.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील ग्रंथालयात डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथपाल सौ. निशा करांडे, सौ. सारिका निकम, दादासो नाळे, जयश माळी, दादा वाघमारे आदीच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.