पंढरपूर सिंहगड मध्ये "विदेशात अभियांत्रिकी उच्च शिक्षणात संधी" या विषयावर व्याख्यान
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी "विदेशात अभियांत्रिकी उच्च शिक्षणात संधी" या विषयावर सोनिया दादासाहेब नवले यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाची सुरुवातीस सोनिया दादासाहेब नवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सोनिया दादासाहेब नवले ह्या सिंहगड काॅलेज च्या माजी विद्यार्थिनी असून यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारताबाहेरील शिक्षणाचे महत्त्व, त्याचे फायदे याशिवाय जगभरातील शैक्षणिक संधीचा कसा लाभ घेता येईल याबद्दल माहिती दिली. याशिवाय एम एस, जीआरई आणि टोफेलच्या परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विदेशातील शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर शैक्षणिक प्रगती साधणे आवश्यक आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. अल्ताफ मुलाणी,प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. सोनाली गोडसे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.