*पंढरपूर सिंहगडच्या आर्या आराध्ये यांची २ कंपनीत निवड*
वार्षिक ५.५० लाख पॅकेजची नोकरी: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील आर्या अमर आराध्ये हिची दोन नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी आर्या अमर आराध्ये हिने वरली इंडिया प्राइवेट लिमिटेड (वार्षिक पॅकेज ५.१५ लाख) आणि स्नाईडर इलेक्ट्रिक (वार्षिक पॅकेज ५.५० लाख) कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कुमारी आर्या जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर येथील स्नाईडर इलेक्ट्रिक मध्ये रूजू झाली आहे.
स्नाईडर इलेक्ट्रिक हि फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी असुन डिजिटल ऑटोमेशन आणि ऊर्जा व्यवस्थापनामध्ये कार्यरत आहे. ही कंपनी ऊर्जा तंत्रज्ञान, रिअल-टाइम ऑटोमेशन, साॅफ्टवेअर इत्यादी क्षेञात सेवा प्रदान करते. या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी आर्या अमर आराध्ये हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
आर्या आराध्ये हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.