पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड □ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४.५ लाख पॅकेज पंढरपूर: प्रतिनिधी

 पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड


□ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४.५ लाख पॅकेज



पंढरपूर: प्रतिनिधी


 कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या २ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या "एक्सेंचर" कंपनीत कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करून जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली आहे. सिंहगड संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणाऱ्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित आय टी कंपनीत नोकरी करीत आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगडला इंजिनिअरिंग काॅलेजला पसंती असून परफेक्ट इंजिनिअर तसेच स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजिनिअर फक्त पंढरपूर सिंहगड मध्ये घडविले जातात. म्हणून आज सिंहगड मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नामांकित आय टी कंपनीत निवडले जात आहेत.

         "एक्सेंचर" हि डब्लिन येथे स्थित आयरिश-अमेरिकन व्यावसायिक सेवा देणारी कंपनी आहे. हि कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लामसलत मध्ये विशेष आहे. एक्सेंचर हि कंपनी फाॅर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांमधील एक कंपनी असुन या कंपनीत ७ लाखांहून अधिक इंजिनिअर्स काम करीत आहेत. याशिवाय जगातील प्रमुख दहा कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या एक्सेंचर कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंजिनिअरींग विभागात मेकॅनिकल डिझाईन हे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माढा येथील इंद्रजित सोमनाथ वडगावे आणि काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना इसबावी (ता.पंढरपूर) येथील अजित शामराव पाटील यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक्सेंचर कंपनीकडून ४.५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या निवडीमुळे पालकांतून आनंदी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  एक्सेंचर कंपनीत निवड झाल्याबद्दल इंद्रजित वडगावे व अजित पाटील यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad