*पंढरपूर सिंहगडच्या चंद्रिका ढाले यांची दोन कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली म्हसवड (ता. माण) येथील कुमारी चंद्रिका प्रकाश ढाले हिने दोन कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. कॅम्पस प्लेसमेंट मधुन दोन्ही कंपनीत तिची निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कुमारी चंद्रिका प्रकाश ढाले हिने पर्सिस्टंट आणि आय बी एम इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन मुलाखत दिल्या होत्या. या मुलाखतीतून तिची पर्सिस्टंट (वार्षिक पॅकेज ५.०१ लाख) आणि आय बी एम इंडिया प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज ४.५० लाख) या कंपनीत निवड झाली आहे. कुमारी चंद्रिका ढाले ही २४ जुलै २०२४ रोजी आय बी एम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीत रूजू होणार असल्याचे तिने सांगितले.
आईबीएम इंडिया प्राइवेट लिमिटेड एक भारतीय सहाय्यक कंपनी असुन ही अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्क मधील अर्मोनक येथे आहे. या कंपनीचे कार्य १७० पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. अशा या कंपनीत कुमारी चंद्रिका ढाले हिची निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.