*'पंढरपूर सिंहगड मध्ये "बिल्डिंग प्लांनिंग अँड डिझाइन यूजिंग ऑटो कॅड" या विषयावर कार्यशाळा संपन्न.*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन.सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता.पंढरपूर) मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागामध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "बिल्डिंग प्लानिंग अँड डिझाइन यूजिंग ऑटोकॅड" या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
या कार्यशाळेत ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर वापरुन स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील इमारतींचे रेखांकन व रचना करण्याविषयीची कार्यशाळा ही दिनांक २ ते ६ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी कॅडडेस्क पुणे येथील कृष्णा बिडवे हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभले होते. कृष्णा बिडवे यांनी विद्यार्थ्यांना इमारतीचे प्लॅनिंग अँड डिजाईन ऑटोकॅड या सॉफ्टवेअर मध्ये करून त्याचा वापर बांधकाम परवान्यासाठी कसा केला पाहिजे याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या सॉफ्टवेअरच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरसाठी खूप फायदा होईल.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील ३१ हून अधिक विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरीत्या इमारतींचे २डी मॉडेलिंग, त्रिमितीय रचना, इमारतींचे प्लॅंनिंग व नगररचना विभागाच्या नियमानुसार डिजाईन तयार केले.
ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यशाळा समन्वयक प्रा. गणेश लकडे व शेखर पाटील, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली.