प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये मोफत सुविधा केंद्र


प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ

स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये मोफत सुविधा केंद्र



पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि मंगळवार, दि. ०९ जुलै २०२४ ला संपणार होती पण दरम्यानच्या कालावधीत अनेक विद्यार्थांना प्रशासनाकडून कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत. ही बाब लक्षात आल्यामुळे आता या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आता विद्यार्थांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त त्यांचा दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

        डिप्लोमा इंजिनिअरिंग सन २०२४-२५ प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १६ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची परंपरा या महाविद्यालयाने कायम राखली आहे. ही प्रकिया बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ते गुरुवार, दि. १८ जुलै, २०२४ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर शनिवार, दि. २० जुलै, २०२४ रोजी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित केल्या जातील. तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार असल्यास त्या सादर करण्याचा अवधी दि. २१ जुलै, २०२४ ते दि.२३ जुलै, २०२४ असेल. अंतिम गुणवत्ता याद्या गुरुवार, दि. २५ जुलै २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील व त्यानंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होईल. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस.गायकवाड (मोबा.क्र.-९८९०५६६२८१) व प्रा.एम.एम.मोरे (मोबा.क्र.-९४२१९६०२५८) यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ अभ्यासक्रमांना मिळालेले एनबीए मानांकन, महाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्ड तसेच गेली सलग सहा वर्षे शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील बहुधा एकमेव खाजगी महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरलेले स्वेरी अभियांत्रिकी हे राज्यात ‘ब्रँड’ बनले आहे. त्यामुळे स्वेरीत प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत आहे. या वर्षीही विद्यार्थी व पालक यांचेकडून स्वेरी डिप्लोमालाच प्रथम पसंती व उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२४-२५ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad