*पंढरपूर सिंहगड मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज ६ जून २०२४ रोजी कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान छञपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. संपत देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. निशा करांडे, प्रा.समाधान माळी, प्रा. उमेश घोलप, प्रा. अजित करांडे, संगिता कुलकर्णी, संजय बनकर, सिद्धेश्वर लवटे, नवनाथ माळी, पांडूरंग परचंडे, अमित करांडे, संतोष भुजबळ आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.