*पंढरपूर सिंहगडचे प्राध्यापक डाॅ. अल्ताफ मुलाणी यांना पेटंट बहाल*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्रा. डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी यांनी "स्मार्ट प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट मशीन" या विषयावर यु. के सरकार कडून डिझाईन पेटंट बहाल करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी पेटंटची निर्मिती केली आहे. यामध्ये या पेटंट चा उपयोग कचरा प्लास्टिक कचरा संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी स्मार्ट प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रणाली तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषणाचा लाभ घेते. संकलित केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व सुका कचरा वेगळा करता येतो.
या पेटंट बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्यासह संस्थेतील सर्व संचालक, पंढरपूर सिंहगड काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.