पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे अन् प्रा. अंजली पिसे यांना पेटंट बहाल
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या प्रा. अंजली पिसे यांनी "व्हेईकल ॲडहाॅक नेटवर्क राऊटिंग डिव्हाईस" या विषयावर भारत सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आला आहे.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका अंजली पिसे यांनी सदर डिझाईन पेटंटची निर्मिती केली आहे. यामध्ये या पेटंट चा उपयोग ग्रामीण व शहरी भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत, सुरक्षित, अपघात नियंत्रण करण्यासाठी आदींसाठी उपयोगात आणता येणार आहे. याशिवाय हे पेटंट वाहन चालकांना उपयुक्त ठरणार आहे.
या पेटंट बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्यासह संस्थेतील सर्व संचालक, पंढरपूर सिंहगड काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.