*पंढरपूर सिंहगडच्या प्राध्यापकांची हैद्राबाद येथील संशोधन केंद्रास भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डॉ एस एस कदम व प्रा. अनिल निकम यांनी सोमवार दिनांक १० जुन २०२४ रोजी हैदराबाद येथील ए आर सी आय या संशोधन केंद्रास भेट दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यादरम्यान ए आर सी मधील डाॅ. संजय भारद्वाज यांनी तेथील होणा-या संशोधनाची इत्थंभूत माहिती प्रेझेंटेशन द्वारे दिली. तसेच सेंटर फाॅर कार्बन मटेरियल्स, सेंटर फॉर लेझर प्रोसेसिंग मटेरियल्स, ॲडव्हान्सड सिरॅमिक मटेरियल्स आणि नॅनो मटेरियल्स या संशोधन विभागांची माहिती सिंहगडच्या प्राध्यापकांना देण्यात आली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील संशोधन वाढविण्यासाठी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. याचबरोबर भविष्यातील संशोधनास आवश्यक लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन असोसिएट डायरेक्टर डाॅ. पी के जैन यांनी दिली.
यादरम्यान पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने डाॅ. संजय ढगे, डाॅ. संजय भारद्वाज तसेच असोसिएट डायरेक्टर डाॅ. पी. के. जैन याचे शाल व विठ्ठल मुर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.