आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी

 आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी 



प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील तावशी, एकलासपूर व अनवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, हाजापूर, पाटखळ या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली.


तालुक्यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्या मुळे शेतीचे फार नुकसान झाले तसेच घरावरील, शाळेवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत आज प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानाचा आढावा घेतला.


या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे अनेक भागात फळ बागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले नाही, केळीचे हे १०० टक्के नुकसान झालेले आहे.


या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आमदार आवताडे यांनी धीर देत, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार आवताडे यांनी यावेळी दिला.


यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांचेसह इतर मंडळी व संबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad