*पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. गणेश बिराजदार यांचे विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी डाॅ. गणेश बिराजदार यांचे लीन स्टार्टअप अँड मिनिमम व्हिएबल प्रॉडक्ट बिझनेस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात डाॅ. गणेश बिराजदार यांनी लीन स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअपचे प्रकार किती? मिनिमम व्हिएबल प्रॉडक्ट कसा मार्केट मध्ये वेळेनुसार महत्वाचा ठरू शकतो हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.