*पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*
प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी, पालक प्रतिनिधी भारत दोषी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान पालक प्रतिनिधी भारत दोशी यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या दरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
दरम्यान विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी विभागाचा शैक्षणिक आढावा उपस्थितीतांसमोर सादर केला. या मेळाव्यात पालक शिक्षक संवाद साधून पालकांनी विचारलेल्या प्रश्नावर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली. या मेळाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. सोमनाथ कोळी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या मेळाव्याचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले.