*पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या सृजन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी सृजन फूड प्रा.लि. चिंचोलीकाटी एमआयडीसी, सोलापूर येथे भेट दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सृजन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड (पार्ले) एम आय डी सी सोलापूर या कंपनी मध्ये औद्योगिक भेट हि दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी आयोजित केली होती.
या भेटीचा मुख्य उद्देश औद्योगिक वातावरणाची ओळख करून घेणे आणि त्या प्रक्रियासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मोटर्सच्या बद्दल माहिती घेणे हा होता.
या भेटीतून विद्यार्थ्यांना पी एल सी आणि स्वयंचलित ऑपरेटिंग सिस्टीम व त्या प्रक्रियेसाठी वापरत आलेल्या विविध प्रकारच्या मोटर्सचे उपयोग आणि माहिती दिली आणि त्या मोटर कंट्रोल पॅनल सोबत कश्या जोडल्यात याची माहिती साईट इंजिनिअर यांनी दिली. या ममधून मुलांना वेग वेगळ्या प्रकारच्या ए सी मोटर्स यांचे प्रात्यक्षिक दाखविले.
या भेटीतून विद्यार्थ्यांना काँट्रॉलींग पॅनल, सर्वो मोटर आणि एसी मोटर या विविध उपकरणांची माहिती मिळाली या या औद्योगिक भेटीसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ७० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ही औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. व्ही. पी मोरे, औद्योगिक भेट समन्वयक प्रा. एन. व्ही. खांडेकर, प्रा. के.पी. जाधव, प्रा. ए .आर. मासाळ, वंदना माळी सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.