आठवड्यातून १५० मिनिटं व्यायाम केल्यास शरीर निरोगी- डाॅ. जगदिश हिरेमठ* *पंढरपूर सिंहगड मध्ये "ह्रदयरोग चिकित्सा व ह्रदयरोग ॲडव्हान्स संशोधन" या विषयावर व्याख्यान संपन्न* पंढरपूर: प्रतिनिधी

 *आठवड्यातून १५० मिनिटं व्यायाम केल्यास शरीर निरोगी- डाॅ. जगदिश हिरेमठ*


*पंढरपूर सिंहगड मध्ये "ह्रदयरोग चिकित्सा व ह्रदयरोग ॲडव्हान्स संशोधन" या विषयावर व्याख्यान संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी


 वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान अलीकडे अवगत आहे. यामुळे तात्काळ उपचार रुग्णावर करणे शक्य झाले आहे. पुढील २० वर्षात अनेक आजार वाढणार आहे. यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. हार्ट अ‍ॅटॅक आलेल्या व्यक्तीवर तात्काळ उपचार होणे आवश्यक आहे. काही आजार हे ताणतणाव, व्यसनापासून उद्भवत असतात. वयाच्या ४० वर्षापासून पुढे व्यायाम, डाईट्स पाळणे गरजेचे आहे. मेडिसिन मध्ये आकलन होत असते अशा वेळेस चागंले परिणाम शरीरावर व मनावर होते. म्हणून संगित मन रमवावे, मिञ-मैञिण मध्ये वावरणे आवश्यक आहे. आठवड्यातून १५० मिनिट व्यायाम आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्यास शरीर निरोगी राहत असल्याचे मत डॉ. जगदिश हिरेमठ यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.

  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी जागतिक कीर्तीचे ह्रदयरोगतज्ञ डाॅ. जगदिश हिरेमठ यांचे "ह्रदयरोग चिकित्सा व ह्रदयरोग ॲडव्हान्स संशोधन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

 या व्याख्यानाचे उद्घाटन ह्रदयरोग तज्ञ डाॅ. जगदिश हिरेमठ, डाॅ. एम. के. इनामदार, डाॅ. व्हि. ए. व्होरा, डाॅ. अरूण मेणकुदळे, सीए. के. एस. माळी, माजी आमदार दत्तात्रय सावंत, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवातीस स्वागत गीताने करण्यात आले. यावेळेस सिंहगड इन्स्टिट्यूट च्या वतीने डाॅ. जगदिश हिरेमठ यांचे शाल, तुळशीहार व विठ्ठल मुर्ती देऊन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

   यादरम्यान डाॅ. इनामदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पंढरपूर परिसरातील सुप्रसिद्ध डाॅक्टर्स, उद्योजक, इंजिनिअर्स, वकील, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, जेष्ठ नागरीक व पञकार, रोटरी क्लब पदाधिकारी, भारत विकास परिषद पदाधिकारी, रोटरियन्स पंढरपूर व सांगोला, भारत विकास परिषद, इंडीयन मेडिकल असोसिएशन, निमा व होमिओपॅथिक ग्रुप, इनरव्हिल क्लब मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतुराज बडवे व वरदा बिडकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad