आ आवताडे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

 आ आवताडे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश 



 प्रतिनिधी - ग्रामपंचायत शिरनांदगी या गावातील भालके गटाच्या ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, काशीराम कोळेकर, रमेश ऐवळे, अतुल चोपडे व दत्ता वाघमोडे या ग्रामपंचायत सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रवेशामुळे मंगळवेढा तालुक्यातील भालके गटाला जोरदार धक्का बसला आहे.


सदरप्रसंगी आमदार आवताडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. सोयीनुसार राजकारणातील भूमिका वेळोवेळी बदलणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना कोणतीही राजकीय दिशा न देणारे भगीरथ भालके हे माजी दिवंगत आमदार स्व.भारत भालके यांच्या विचारांचा वारसा चालवण्यामध्ये असमर्थ राहिल्याने आम्ही सर्वांनी एकमुखाने हा निर्णय घेतला असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवले.


यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा पक्षाच्या व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ होत आहे हे प्रवेशा दरम्यान अधोरेखित झाले आहे. सर्व समावेशक समाजकारण आणि सलोख्याचे राजकारण करत असताना मतदार संघातील मूलभूत आणि पायाभूत बाबींचा विकास करणे हेच देह डोळ्यासमोर ठेवून आपण आतापर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये माझ्या पदाचा आणि अधिकाराचा वापर केला त्यामुळेच अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आणि नेतृत्वाला बळकटी देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, युवक नेते तानाजी काकडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, जेष्ठ नेते यशवंत खताळ, युवक नेते शहाजी गायकवाड, माजी सरपंच पांडुरंग कांबळे, अंकुश खताळ, उपसरपंच महादेव खताळ, ग्रामपंचायत सदस्य अंकुश कसबे, राजू सुतार समाधान खांडेकर, नाथपंथी समाजाचे लक्ष्मण इंगवले, डॉ सहदेव खताळ, परमेश्वर खांडेकर, पांडुरंग जानकर, हरी लवटे आदी मान्यवर जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad