*पंढरपूर सिंहगड मध्ये "ह्रदयरोग चिकित्सा व ह्रदयरोग ॲडव्हान्स संशोधन" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी जागतिक किर्तीचे ह्रदयरोग तज्ञ डाॅ. जगदिश हिरेमठ यांचे "ह्रदयरोग चिकित्सा व ह्रदयरोग ॲडव्हान्स संशोधन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हे व्याख्यान सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रोटरी क्लब पंढरपूर, रोपरियन्स पंढरपूर व सांगोला, भारत विकास परिषद, इंडीयन मेडिकल असोसिएशन, निमा व होमिओपॅथिक ग्रुप, इनरव्हिल क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानतून डाॅ. जगदीश हिरेमठ यांचे व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डाॅ. व्ही. ए. वोहरा, डाॅ. एम. के. इनामदार, पुणे येथील श्रीमती काशिबाई नवले मेडिकल काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. अरविंद भोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थिती रहाणार आहेत.
या कार्यक्रमाचा पंढरपूर व पंढरपूर परिसरातील सर्व नागरिक, डाॅक्टर्स, इंजिनिअर्स, ॲडव्होकेट, उद्योजक, महिला बचतगट, तरूण वर्ग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक सह शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे व्याख्यान सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या कालावधीत संपन्न होणार आहे.