*पंढरपूर सिंहगड मध्ये समीर शेख यांचे व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये २३ मार्च २०२४ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात आय आय सी अंतर्गत "माय स्टोरी मोटिव्हेशनल
सेशन बाय सक्सेसफुल इनोवेटर" हि एँक्टीव्हिटी घेण्यात आली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
यावेळेस प्रमुख व्याख्याते समीर शेख यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. समीर शेख हे एहान बायो इंडस्ट्री चे मॅनेजिंग डायरेक्टर असुन त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना बोलताना बायो इंडस्ट्री चे महत्व, त्यांची उभारणी कशी करावी हे सांगितले. याशिवाय बायो गॅस वर आधारित वेगवेगळे प्रकल्प, प्रॉडक्ट कसे तयार करू शकतो हे सांगितले. त्याचं प्रमाणे भविष्यात शाश्वत ऊर्जेच्या आधारवर आपण प्रकल्प , प्रॉडक्ट कसे तयार करावे याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन व आभार डाॅ. शाम कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.