*लक्ष्मी दहिवडी येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*
लक्ष्मी दहिवडी:
सावित्रीबाई जोतीराव फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. अशा सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे अभिवादन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन गोरख बनसोडे, विजय जुंदळे यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, दगडू माळी, नितिन बनसोडे, पोपट टाकळे, अनिल टाकळे, सुहास क्षीरसागर, दत्तात्रय कोरे, राजकुमार मेटकुटे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोदराजे बनसोडे आदींसह अनेक नागरीक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.