*महापुरुषांचे चरित्र हे तरुणांचे चारित्र्य असते- प्रा. तुकाराम मस्के*
*○पंढरपूर सिंहगड मध्ये शिवजयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
छञपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे कायम आपल्या सोबत असले पाहिजे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा छञपती शिवाजी महाराजांचे विचार रुजले पाहिजेत. दुसर्यासाठी जगायला शिकायला तर दुसरे आपल्यासाठी मरायला येतील हे शिवाजी महाराज विचार आहेत. सोशल मिडीयाचा प्रभाव जास्त पडला आहे. शिवाजी महाराजांचा वेषांतर प्रवास प्रभावी ठरला आहे. शिवाजी महाराजांची शिस्त नेतृत्वात होती. राजा प्रजा बरोबर कसा वागतो हे बघुन प्रजा राजा सोबत तशीच वागत असते. म्हणून राजा कर्तृत्वसंपन्न असला पाहिजे. स्वराज्याचे हित सांभाळणारा राजा म्हणून छञपती शिवाजी महाराज नाव घेतले जाते. संकट कधी येईल सांगता येत नाही म्हणून कायम आपण सज्ज असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राला भूमीला प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या संस्कारात, रक्ततात, मनगटात स्वराज्य होते म्हणून स्वराज्य उभे राहिले. बक्षीस अन् शिक्षा योग्य वेळेला देणारे शिवाजी महाराज होते. जगात कर्तुत्व सिद्ध करायचे असेल तर मेहनत केली पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. छञपती शिवाजी महाराज यांना शेतकऱ्यांबद्दल खुप आदर होता. जगात यशस्वी व्हायचे असेल तर तत्वे सांभाळता आली पाहिजे. आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक विचार जगाचे कल्याण करू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे. आयुष्यात महापुरुषाचे चरित्र अभ्यासा म्हणजे तुम्हाला जगण्यात उमेद निर्माण होईल. जिद्द, परिश्रम, कष्ट प्रामाणिकपणे केल्यास यश निश्चित भेटते. मनाचे, अंतःकरणाचे शुद्धीकरण समाजामध्ये जीवन जगताना असणे आवश्यक आहे. चारित्र्याची जडणघडण होणे आवश्यक असल्याचे मत प्रा. तुकाराम मस्के यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. तुकाराम मस्के यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्रकुमार नायकुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी मानले.