आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात २१ विकास सोसायटी संस्थांना मंजुरी
मंगळवेढा/प्रतिनिधी
कोणतेही सिबिल न लागता, कोणतीही पत न पाहता सहकार क्षेत्रामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे एकमेव साधन म्हणून गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायटी कडे पाहिले जाते.मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी अडचणी येत होत्या अनेक शेतकरी माझ्याकडे येऊन गाऱ्हाणे घालत होते त्यामुळे सहकाराचा पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने मंगळवेढा तालुक्यामध्ये २१ नवीन विविध कार्यकारी सोसायट्या स्थापन केल्या असून या सोसायट्यामुळे सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले
ते बोलताना पुढे म्हणाले की केंद्रात सहकार खाते निर्माण केल्यानंतर सहकारी संस्था काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आम्ही ज्या गावात गरज आहे त्या गावात प्रथमतः प्रस्ताव सादर केले होते सर्व प्रस्तावाची परिपूर्ण पूर्तता केल्यानंतर नुकतेच आम्हाला 22
प्रस्तावांपैकी २१ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे या सोसायट्या निर्मितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे
लक्ष्मी विकास सोसायटी यड्राव, जिजामाता विकास संस्था हिवरगाव, सिद्धेश्वर विकास संस्था माचनूर, पीतांबर विकास संस्था रहाटेवाडी, जय हनुमान विकास संस्था येळगी, कै. दत्तात्रय भाकरे विकास संस्था आंधळगाव, बनशंकरी विकास संस्था लक्ष्मीदहीवडी, बाळूमामा विकास संस्था मानेवाडी, बिरोबा विकास संस्था रेवेवाडी,माउली विकास संस्था नंदेश्वर, माणगंगा विकास संस्था मारापूर, लक्ष्मी विकास संस्था मुंढेवाडी, महादेव (अण्णा) आवताडे विकास संस्था भोसे, शिवराज विकास संस्था बोराळे, वेताळ विकास संस्था शिरशी, आमसिद्ध अण्णा केदार विकास संस्था डोणज, संत गाडगेबाबा विकास संस्था बावची,संतभूमी विकास संस्था मंगळवेढा, स्व. धानप्पा माने विकास संस्था कात्राळ, संतमेळा विकास संस्था मंगळवेढा, सिद्धेश्वर विकास संस्था तळसंगी आदी विकास संस्थांना मंजुरी मिळाली आहे.
या सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लावणे हाच माझा केवळ प्रामाणिक प्रयत्न आहे.जिल्हात माजी आमदार दिगंबर बागल यांनी करमाळ्यात १६, दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरेश हसापुरे यांनी १४ विकास सोसायट्या मंजूर केल्या होत्या. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यात २१ सोसायट्यांना मंजुरी मिळाली आहे या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही आमदार समाधान अवताडे यांनी सांगितले.