पंढरपूर सिंहगड मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांचे सह कर्मचाऱ्यांचे रक्तदान*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांचे सह कर्मचाऱ्यांचे रक्तदान*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १०० हून अधिक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.



 रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरॅक्ट क्‍लब सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.

   या शिबिरात जवळपास १०० हुन अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी तसेच रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर सदस्यांनी रक्तदान केले. गरजू रक्तदात्यास हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, रासेयो समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, यासह एनएसएस क्लबचे प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, सेक्रेटरी अथर्व कुराडे विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी नाना वाघमारे, किशोर नरळे, आकाश चौगुले, श्रद्धा पंधे, आनुप नायकल, प्राप्ती रुपनर, तेजस्वी खाांडेकर, चेतन मासाळ, राशिद पठाण, सत्यम कापले, वैष्णवी कंडरे, हर्षद शिंदे, सुमित अवताडे, वैष्णवी पडगळ, आकांक्षा कवडे, प्रणव देवराम, साक्षी भिवरे, तसेच रोटरी क्लबचे प्रेसिडेंट ईश्वरी ताटे, सेक्रेटरी प्रणव हेंबाडे यासह हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad