*पंढरपूर सिंहगडच्या वतीने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधन*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आष्टी गावामध्ये चालू असुन २९ जानेवारी २०२४ रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे निरोप सत्र आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत व अंधश्रद्धा निर्मूल यावर प्रबोधन कार्यक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना अपारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत याचबरोबर अपारंपारिक ऊर्जेचे फायदे अपारंपारिक ऊर्जेचे संकलन व अपारंपारिक ऊर्जा वापरून होणारे नवनवीन प्रकल्प यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले या मार्गदर्शनाकरता डॉ. अतुल आराध्ये यांनी यासंदर्भात उपस्थित ग्रामस्थांना उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन बाबत असलेले गैरसमज व त्यातून होणाऱ्या विचित्र घटना या टाळण्यासाठी आपण सजग नागरिक या नात्याने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे व अंधश्रद्धेला बळी कधीच पडले नाही पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन प्रा.गुरुराज इनामदार यांचे लाभले. २९ जानेवारीचा शिबिराचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला त्या दिवशी निरोप हा आष्टी ग्रामस्थाकडून शिबिरास उपस्थित असणाऱ्या सर्वांना देण्यात आला.
आष्टी ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी हे शिबिर संपन्न करण्यास भरपूर मदत केली व त्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी संपन्न झाले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, रासेयो समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, यासह एनएसएस क्लब प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, सेक्रेटरी अथर्व कुराडे विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी नाना वाघमारे, के. टी. नरळे, ए .ए. चौगुले, एस. के. पंधे, ए. बी. नायकल, पी. एम. रुपनर, टी. एस. खाांडेकर, सी. एल. मासाळ, एस. डी. आसबे,आर. एम .पठाण, एस. पी. कापले, व्ही. व्ही. कंडरे, एच. एच. शिंदे, एस. व्ही. अवताडे, पी. डी. देवराम, एस. ए. भिवरे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी आणि ग्रामपंचायत आष्टीसह ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.