राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेल च्या उपाध्यक्ष पदी प्रकाश मंगाणे यांची निवड

राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेल च्या उपाध्यक्ष पदी प्रकाश मंगाणे यांची निवड




पंढरपूर: प्रमोद बनसोडे


राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

   या कार्यक्रमामध्ये तरुण उद्योजक व दांडगा जनसंपर्क असलेले युवक प्रकाश मंगाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी निश्चित पणे तरूण व नवीन उद्योजकांना लाभदायक ठरणार असल्याने प्रकाश मंगाणे यांचे सर्व उद्योजक क्षेञातुन अभिनंदन होत आहे.


    यावेळी प्रकाश मंगाणे बोलताना म्हणाले, भविष्यात येणारा काळ हा उद्योग क्षेत्रात क्रांती घडविणार असणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून देण्यात आलेली जबाबदारी मी निश्चित पणे निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून तरुण उद्योजकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी पञकारांशी बोलताना व्यक्त केले.

    यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.