*सिंहगडच्या विद्युत विभागातील विद्यार्थ्यांची सौर ऊर्जा प्रकल्पास भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पास बुधवार 01 नोव्हेंबर 2023 रोजी भेट देऊन माहिती जाणून घेतली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्य कसे चालते, डीसी एनर्जीचे एसी एनर्जी मध्ये कसे रूपांतर होते व नंतर एम एस ई बी ला ती एनर्जी कशाप्रकारे वितरित केली जाते याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यासाठी आर वाय बी इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड चे अभियंता श्री. चंद्रकांत चोरमुले यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
ही औद्योगिक भेट यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्युत विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले, आय व्ही समन्वयक प्रा. विनोद मोरे, प्रा. किशोर जाधव, कविता आदलिंगे आदींसह विद्युत विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.