*सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने क्रीडामंत्री निवेदन सादर*
सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने क्रीडा संबंधित समस्याचे निवेदन मा. ना. श्री. संजय बनसोडे
मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी यांना नितीन भटारकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर व राजीव कक्कड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.
क्रीडा व शारीरिक शिक्षण हे शिक्षणाचे अविभाज्य अंग असले तरी विशेषता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्षात क्रिडांगण आणि क्रीडा सुविधा देणाऱ्या शाळा, विद्यालये, महाविद्यालये यांची संख्या विदर्भातील खासकरून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश भागात अत्यल्प आहे.
बरेच महाविद्यालये शारीरिक शिक्षण स्नेहसंमेलनातील क्रीडा साहित्य फक्त सामन्यापूर्तीच मर्यादित असते, जलतरण पुलांचा अभाव, पुरेसे मैदान नसने, जिमन्याशिम नसने, क्रीडा साहित्य नसने, योग्य प्रक्षिक्षक नसणे आदी समस्या आहेत आहेत. तसेच तालुक्यातील शिक्षण विभागा मार्फत घेणात येणाऱ्या क्रीडासंबंधाने आर्थिक सहकार्य दिल्या जात नसून खाजगी व सरकारी शाळेमधील राज्यस्तरावर पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठीचा खर्च स्वतः करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील मेहनती व होतकरू गरीब विद्यार्थी आर्थिक विवणंचनेमूळे वंचीत राहात आहेत.सिंदेवाही तालुका क्रीडा संकुलनचे कामाची चौकशी करण्यात यावी. करिता योग्य ती कारवाही आपल्या स्तरावरून करावी. अशी मागणी सचिन रामटेके युवा कार्यकर्ता सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वहाबभाई सैय्यद ज्येष्ठ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सिंदेवाही यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
*तेज महाराष्ट्र वार्ता करिता चंद्रपूर जिल्हा रिपोर्टर वहाबअली सैय्यद यांची रिपोर्ट*