*पंढरपूर सिंहगड मध्ये करिअर अपाॅर्चुन्युटी या विषयावर सेमिनार संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार ३ नोव्हेंबर २०२३ रोजी करिअर अपाॅर्चुन्युटी या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते. हे सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इंटरशिप आणि इनोवेशन एजअ करिअर अपाॅर्चुन्युटी या विषयावर सेमिनार घेण्यात आले. या सेमिनार मध्ये इ. डी. सी. सेल व आय आय सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या सेमिनार मध्ये डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, उद्योग व्यवस्था मध्ये विविध पर्याय आहेत. जसे शाखा, आऊटसोर्सिग असे पर्याय आहेत. आपल्या अभ्यास खर योग्य तो पर्याय कसा निवडावा. त्याचबरोबर फंडीगच्या संधी कशा तयार करायच्या त्यासाठी ॲन्जल इन्व्हेस्टर, बॅक, सरकारी योजना याचा लाभ कसा घ्यावा याबद्दल डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी सखोल माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
या सेमिनार शेवटी आपल्या उद्योग कसा नोंदणी करावा. उद्यम आधार व शार्प ॲक्ट चा परवाना कसा काढायचा याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हा सेमिनार यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. मनोज कोळी, प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. सचिन घाडगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.