जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगांव ( भोसे) स्कूल कमिटी च्या अध्यक्षपदी दिपक देविदास पाटील (देवकर )तर उपाध्यक्ष पदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक अध्यक्ष युवा नेतृत्व शहाजहानभाई शेख यांची बिनविरोध निवड
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगांव ( भोसे) स्कूल कमिटी च्या अध्यक्षपदी दिपक देविदास पाटील (देवकर )तर उपाध्यक्ष पदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक अध्यक्ष युवा नेतृत्व शहाजहानभाई शेख यांची बिनविरोध निवड झाली . सचिव पदी शाळेचे मुख्याध्यापक रेपाळ सर यांची निवड करण्यात आली . त्याप्रसंगी नूतन स्कूल कमिटीचे सदस्य रामभाऊ कोरके पाटील ,दिलीप कडाळे, विकास फाळके, सुधाकर थिटे महिला सदस्या, सोनाली ताई देवकर, प्रामुख्याने उपस्थित होते. तर सुगांव ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी किशोर देवकर, ज्येष्ठ मार्गदर्शक बबन अण्णा फाळके, पोलीस पाटील देविदास बापू देवकर पाटील, माजी सरपंच प्रतिनिधी भाऊसाहेब देवकर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भाऊ देवकर पाटील, प्राध्यापक अण्णासाहेब कोरके स्कूल कमिटीचे माजी अध्यक्ष रावसाहेब देवकर, उपाध्यक्ष प्रतिनिधी रामभाऊ कोरके ,महावीर देवकर पाटील, प्राध्यापक आखाडे सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- सुगांव ( भोसे) चे मुख्याध्यापक रेपाळ सर, शिक्षिका रेपाळ मॅडम, टरले मॅडम व लोहार मॅडम उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन उपाध्यक्ष शहाजहानभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना, सांगितले की शाळेच्या सोयी सुविधा डिजिटल व्यवस्था असेल, पाण्याची लाईटची व्यवस्था असेल, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस असतील, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पावले असतील ,शाळेच्या परिसरातील सुशोभिकरण असेल ,लाईटचा प्रश्न असेल ,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोयी सुविधा असतील या सर्व सोयी सुविधांचा लाभ आपल्या शाळेला 100% मिळण्यासाठी नूतन सदस्य यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्या शाळेला निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू व विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी अडचण निर्माण होईल , त्या त्या ठिकाणी पुढाकार घेऊन शाळा व शाळेतील विद्यार्थी शिक्षक त्यांच्यासाठी कायम प्रयत्नशील राहू . 🙏🙏🙏🙏🙏🙏 तसेच पाठीमागील काही दिवसांपूर्वी या शाळेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रेपाळसर व सर्व संपूर्ण शाळा स्टाफ यांना सहकार तपस्वी ब्रह्मदेव दादा माने सहकारी पतसंस्था व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आचार्य दोंदे आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्या बद्दल नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व ग्रामस्थांच्या वतीने सरांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या*!