लोहयात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जीवंत देखाव्यादवारे इतिहास दाखविणारा "गाथा मुक्तीसंग्रामाची" कार्यक्रम उत्साहात संपन्न
--------------------------------------
*लोहा तालुका प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जीवंत देखाव्यादवारे इतिहास दाखविणारा " गाथा मुक्तीसंग्रामाची" कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमीपुत्राचा स्वातंत्र्यसैनिकांचा जाज्वल्य धगधगता इतिहास सांगणारे नाटक " गाथा मुक्तीसंग्रामाची" यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी कंधार डॉ.शरद मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ प्रणिताताई देवरे-चिखलीकर, नगरसेविका सौ. कल्पनाताई चव्हाण, लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंडे, दिग्दर्शक तथा समन्वयक डॉ. नाथा चितळे , स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक श्रीमती संगेवार, डॉ. काप्रतवार ,तलाठी मारोती कदम व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गाथा मुक्तीसंग्रामाची या नाटकाद्वारे मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात निजामाच्या जुलमी राजवटीला व त्यांच्या रझाकारा विरोधात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राॅफ , गोविंद पानसरे, वेदप्रकाश , हैद्राबाद संस्थानाचे निजाम मिर उस्मान आली , कासिम रझवी यांची भूमिका या नाटकाद्वारे दाखविण्यात आली व तसेच भारत सरकारने सैन्य पाठवून दि. १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थान खालसा करून भारतात विलीन केले.
असा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा धगधगता जिवंत इतिहास या नाटकाद्वारे दाखविण्यात आला.
सदरील कार्यक्रम पाहण्यासाठी लोहा शहर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.