पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वागत* *डाॅ. संगीता पाटील यांचे "ट्रेस मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान संपन्न*

*पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वागत*


*डाॅ. संगीता पाटील यांचे "स्ट्रेस मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान संपन्न*



पंढरपूर: प्रतिनीधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.

    या दरम्यान डाॅ. संगीता पाटील यांचे "स्ट्रेस मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात डाॅ. संगीता पाटील यांचे स्वागत प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे कर्तव्यदक्ष विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

   यादरम्यान डाॅ. संगीता पाटील म्हणाल्या, आयुष्यात मनाच्या विरूध्द एखादी गोष्ट घडली की ट्रेस वाढतो. त्यामुळे मन अस्थिर होते. ताणतणाव वाढला की माणुस डाॅक्टरकडे जाऊन उपचार घेत असतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक ताणतणाव असतात. ताणतणाव हा मनासारखे शाखा, काॅलेज न भेटल्यावर पण येऊ शकतात. अशावेळेस झालेल्या गोष्टींवर स्ट्रेस घेऊ विचार करण्यात बसण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून द्यायला शिकले पाहिजे. चांगला व्यक्ती व्हायचे असेल तर मेहनत केली पाहिजे. विद्यार्थी अवस्थेत तुम्ही चांगला अभ्यास केला तर भविष्यात चांगला व्यक्ती व्हाल. स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे आवश्यक असते. अभियांत्रिकी शिक्षणाची मेहनत घेऊन चागंले करिअर केले तर निश्चित भविष्यात चांगला पार्टनर तुम्हास भेटेल. चांगला अभ्यास करा. वारंवार एकच चुक करून नका. वेळेचे योग्य नियोजन करून मेहनत करून करिअरचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करावे असे मत डाॅ. संगिता पाटील यांनी यादरम्यान पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad