*पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची " एमडाॅक्स " कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
"एमडाॅक्स" हि एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निग, मोबाईल नेटवर्क सर्विसेस, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे. अशा कंपनीत पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेले वाखरी (ता.पंढरपूर) येथील कृष्णा शामराव माने आणि तिसंगी (ता.पंढरपूर) येथील अविनाश औदुंबर भिलारे या दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ५.३० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती प्रा. सुभाष पिगंळे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची माहिती देऊन प्लेसमेंट पुर्व संपुर्ण तयारी करून घेतली जाते. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच नामवंत असलेल्या कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज प्रयत्नशील आहे. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातून कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या आकर्षक वेतनावर प्लेसमेंट मिळू लागले असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
"एमडाॅक्स" या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.