*पंढरपूर सिंहगडच्या सलमान बेदरेकर यांची "फुजी इलेक्ट्रिकल इंडिया" कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या सलमान बेदरेकर यांची "फुजी इलेक्ट्रिकल इंडिया" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.
"फुजी इलेक्ट्रिकल इंडिया" हि कंपनी पुणे येथे कार्यरत असुन २००९ मध्ये स्थापन झालेली जापनीज कंपनी आहे. या कंपनीत एक हजार पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असुन कंपनीचे कार्यालय भारतातील चेन्नई व पुणे येथे आहेत. हि कंपनी सोलार, युपीएस, एसी ड्राईव्हज् आदी इलेक्ट्रिकल क्षेत्रात उल्लेखनीय सेवा प्रदान करत आहे.
"फुजी इलेक्ट्रिकल इंडिया" कंपनीत निवड झाल्याबद्दल सलमान बेदरेकर यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.