*पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची "स्क्युस इन्फोटेक" कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असतानाच तीन विद्यार्थ्यांची स्क्युस इन्फोटेक प्रा. लि. कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिगंळे यांनी दिली.
"स्क्युस इन्फोटेक प्रा. लि." कंपनी इंट्रानेट पोर्टल, विक्रेता, व्यवस्थापन पोर्टल, ग्राहक पोर्टल, ई-काॅमर्स, फ्रेंचाइज पोर्टल आदी क्षेत्रात कार्यरत असून या कंपनीत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेली करकंब (ता.पंढरपूर) येथील साक्षी सुधीर खारे, पंढरपूर येथील प्रतिक राऊत आणि मंगळवेढा येथील मोईन मुजावर या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली आहे.
"स्क्युस इन्फोटेक प्रा. लि." कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.