*पंढरपूर सिंहगड मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आठवडा साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आठवडा (NEP-2020Week) साजरा करण्यात आली असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
भारतामधील १९६८ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर २०२० नुसार भारताने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून करण्यास सुरुवात केली. यासंदर्भामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल माहिती व्हावी या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
हा सप्ताह एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रश्नमंजुषेचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या प्रश्नमंजुषा मध्ये ३६१ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजनाचे समन्वयक म्हणून डॉ. दीपक गानमोटे यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.