पंढरपूर सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची “कॉग्निझंट” कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनीधी
कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील शिक्षण घेतलेल्या १० विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या "कॉग्निझंट" कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील ऋतुजा रमेश कुंभार, सानिया शुकुर तांबोळी, मानसी सोमनाथ नवले, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील आसावरी अनंत बोक्षे, शुभम अशोक सलगर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रणय प्रदीप यादव, सुदर्शन महालिंग दुधाळे, अनिकेत बाळासाहेब जगताप, ञिमुर्ती बलभीम शिंदे, महेश दिलीप झुंजारे आदी १० विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ४ लाख ते ५.४० लाखांचे वर्षिक पॅकेज मिळाले आहे.
सिंहगड काॅलेज पंढरपूर येथील १० विद्यार्थ्यांची माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित कॉग्निझंट बहुराष्ट्रीय कंपनी निवड झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
"काॅग्निझंट" कंपनीत निवड निवड झाल्यालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. अतुल कुलकर्णी, राजाराम राऊत आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.