*पंढरपूर सिंहगडच्या सानिया तांबोळी ची ३ नामांकित कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेली सानिया शुकूर तांबोळी हिची आंतरराष्ट्रीय असलेल्या कॅपजेमिनी, टाटा कन्सलटन्सी सर्विसेस आणि काॅग्निझंट या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मल्टिनॅशनल तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानांची माहिती देऊन प्लेसमेंटसाठी आवश्यक असलेली संपुर्ण तयारी करून घेतली जाते. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थांना जगातील नामांकित कंपनीत नोकऱ्या मिळत आहे. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातून कॅम्पस प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या आकर्षक वेतनावर प्लेसमेंट मिळू लागले असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. कॅपजेमिनी आणि काॅग्निझंट या नामांकित कंपन्या फक्त पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये येत असुन यामुळे विद्यार्थ्यांना आय. टी. कंपनीत करिअर करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
सानिया तांबोळी हिची कॅपजेमिनी (वार्षिक पॅकेज-४.२५ लाख), टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (वार्षिक पॅकेज ३.३७ लाख) आणि काॅग्निझंट (वार्षिक पॅकेज ४ लाख) अशा या ३ कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून सानिया शुकूर तांबोळी ची वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.